JJ act 2015 कलम ८० : विहित कार्यपद्धती पूर्ण न करता बालकास दत्तक घेण्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८० :
विहित कार्यपद्धती पूर्ण न करता बालकास दत्तक घेण्यास शिक्षा :
जर कोणी व्यक्ती किंवा संस्था, एखादे अनाथ, सोडून दिलेले किंवा ताब्यात दिलेले बालक, या अधिनियमातील तरतुदी पूर्ण न करता दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहणासाठी) देऊ करील, देईल किंवा स्विकारील तर सदर व्यक्ती किंवा संस्था तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रुपये दंडाच्या किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल :
परंतु असे की, सदर अपराध एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेनी केलेला असल्यास, सदर संस्थेचा प्रमुख आणि सदर दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेच्या दैनंदिन कामकाजास जबाबदार असलेल्या व्यक्तीस वर नमूद शिक्षेव्यतिरिक्त, किमान एक वर्षासाठी सदर संस्थेची कलम ४१ अन्वये केलेली नोंदणी रद्द केली जाईल आणि सदर संस्थेस कलम ६५ अन्वये दिलेली मान्यता रद्द केली जाईल.

Leave a Reply