बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २८ :
समितीच्या संबंधात कार्यपद्धती :
१) समिती दर महिन्यातून किमान २० दिवस कार्यरत असेल आणि विहित केल्याप्रमाणे नियम आणि क्रियारीती अनुसार कामकाज करेल.
२) कार्यरत बाल अभिरक्षा संस्थेच्या कारभाराची आणि बालकल्याणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी दिलेली भेट ही समितीची बैठक असल्याची समजले जाईल.
३) बाल कल्याण समिती कार्यरत नसेल तेव्हा, काळजी, देखभाल आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकास बाल सुरक्षागृहात ठेवण्यापूर्वी वैयक्तिरित्या समितीच्या कोणत्याही सदस्यासमक्ष किंवा इतर योग्य व्यक्तीसमक्ष हजर केले जाईल.
४) समितीच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास, योग्य निर्णय होईपर्यंत बहुमताच्या निर्णयाप्रमाणे आणि असे बहुमत होत नसल्यास समितीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
५) पोटकलम (१) मधील तरतुदींच्या अधीन राहून, कोणत्याही समिती सदस्याच्या अनुपस्थितीत समितीमधील इतर सदस्य कामकाज पाहतील आणि केवळ कामकाचाच्या काळात एखाद्या सदस्याच्या गैरहजेरीच्या कारणावरुन समितीचा निर्णय अवैध ठरणार नाही :
परंतु अंतिम निर्णयासाठी किमान तीन सदस्य हजर असणे आवश्यक असेल.