Site icon Ajinkya Innovations

IT Act 2000 कलम ६६ख(ब) : चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६६ख(ब) :
चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा :
जी कोणी व्यक्ती, चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने आहेत याची माहिती असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना, कोणतीही चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त करील किंवा ठेवून घेईल ती व्यक्ती, एकतर तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल.

Exit mobile version