माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ८४ख(ब) :
१.(अपराधांना प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, कोणत्याही अपराधास प्रोत्साहन (चिथावणी) देईल तो, जर प्रोत्साहन दिलेले कृत्य, प्रोत्साहन दिल्याच्या परिणामी घडले असेल तर, आणि अशा प्रोत्साहनाच्या शिक्षेसाठी या अधिनियमाद्वारे कोणतीही स्पष्ट तरतूद केलेली नसेल, तर या अधिनियमाखालील अपराधासाठी तरतूद केलेल्या शिक्षेस पात्र असेल.
स्पषटीकरण :
जेव्हा असे कृत्य किंवा अपराध, चिथावणी दिल्यामुळे किंवा कट केल्यामुळे किंवा प्रोत्साहन ठरेल असे सहाय्य केल्यामुळे घडून आले असेल तेव्हा, असे कृत्य किंवा अपराध हा प्रोत्साहन (चिथावणी) दिल्यामुळे घडून आले आहे असे म्हणता येईल.)
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४५ द्वारे दाखल.