माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७ :
इलेट्रॉनिक रेकॉर्ड टिकवून ठेवणे :
१) दस्तऐवज, अभिलेख किंवा माहिती विनिर्दिष्ट कालावधीसाठी टिकवून ठेवण्यात आला पाहिजे अशी तरतूद एखाद्या कायद्यात करण्यात आली असेल तर असे दस्तऐवज अभिलेख किंवा माहिती इलेक्ट्रॉनिक नमुन्यात टिकवून ठेवण्यात आली असेल तर-अभिलेख किंवा माहिती इलेक्ट्रॉनिक नमुन्यात टिकवून ठेवण्यात आली असेल तर-
(a)क)अ) त्यामध्ये अंतर्भूत असलेली माहिती नंतरच्या संदर्भात वापरता येईल अशाप्रकारे प्राप्त करण्याजोगी असेल;
(b)ख)ब) इलेक्ट्रॉनिक अभिलेख मुळात ज्या नमुन्यात निर्माण करण्यात, पाठवण्यात आले किंवा मिळाले असतील त्याच स्वरूपात किंवा माहिती मुळात ज्या स्वरूपात निर्माण करण्यात, पाठवण्यात किंवा प्राप्त करण्यात आली असेल त्याच मूळ स्वरूपाचे प्रतिनिधित्व करू शकेल अशा स्वरूपात टिकवून ठेवण्यात आली असेल;
(c)ग) क) अशा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे मूळ, त्याचे इच्छित स्थान, ते पाठवण्याची किंवा मिळाल्याची तारीख ओळखणे सोयीचे होईल असे तपशील अशा इलेक्ट्रॉनिक अभिलेखात उपलब्ध असतील, तर ते आवश्यकता पूर्ण करतात असे मानण्यात येईल. परंतु एखादे इलेक्ट्रॉनिक रेकार्ड पाठवणे किंवा प्राप्त करणे शक्य होण्याच्या प्रयोजनासाठीच केवळ आपोआप निर्माण होणाऱ्या कोणत्याही माहितीच्या बाबतीत हा खंड लागू असणार नाही.
२) दस्तऐवज, अभिलेख किंवा माहिती इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपात टिकवून ठेवण्याची तरतूद ज्यामध्ये स्पष्टपणे करण्यात आली असेल अशा कोणत्याही कायद्याला या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होत नाही.