माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७७ :
१.(शास्ती नुकसानभरपाई किंवा जप्ती यामुळे अन्य शिक्षेमध्ये हस्तक्षेप न होणे) :
या अधिनियमान्वये दिलेला नुकसानभरपाई निवाडा, लादलेली शास्ती किंवा केलेली जप्ती यामुळे, त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याद्वारे नुकसानभरपाई निवाडा देण्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारची शास्ती किंवा शिक्षा लादल्यास प्रतिबंध होणार नाही.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३८ द्वारे कलम ७७ सुधारणा.