माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७४ :
लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करणे :
जो कोणी, कोणत्याही लबाडीच्या किंवा बेकायदेशीर प्रयोजनासाठी एखादे १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र निर्माण करील, प्रसिद्ध करील किंवा अन्य प्रकारे उपलब्ध करील त्याला दोन वर्षांपर्यंतची कारावासांची शिक्षा होईल किंवा दोन लाख रूपयांपर्यंतची दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.