माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६७क(अ) :
लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्याचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठविल्याबाबत शिक्षा :
जी कोणी व्यक्ती ज्यात लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृतीचा किंवा वर्तणुकीचा अंतर्भाव आहे असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करील किंवा पाठवील अथवा प्रसिद्ध करण्याची किंवा पाठविण्याची व्यवस्था करील अशी व्यक्ती, पहिल्या अपराधासाठी पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दहा लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच दहा लाक रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल.