माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २९ :
संगणक आणि माहितीसाठी यामध्ये प्रवेश :
१) कलम ६८ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींना बाधा न पोहोचता, नियंत्रक किंवा त्याने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी याला १.(या प्रकरणाच्या कोणत्याही तरतुदीचे कोणतेही उल्लंघन झाले आहे ) असा संशय घेण्यास पुरेसे कारण असेल तर, कोणत्याही संगणक यंत्रणेमध्ये अंतर्भूत असलेली किंवा तेथे उपलब्ध असलेली कोणतीही माहिती किंवा माहिती साठा मिळविण्यासाठी शोध घेण्याच्या किंवा घेवविण्याच्या प्रयोजनासाठी असा संगणक, कोणतेही उपसाधन, माहिती संग्रह किंवा त्याच्याशी संलग्न माहिती यामध्ये प्रवेश असेल.
२) पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी, नियंत्रक किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती, त्या संगण यंत्रणेची, सामग्रीच्या माहिती संग्रह उपसाधानाची प्रभारी असेलेल्या किंवा अन्य प्रकारे त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला, त्याला आवश्यक वाटेल असे वाजवी तांत्रिक आणि इतर सहाय्य पुरविण्यास आदेशाद्वारे निदेश देऊ शकेल.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १४ द्वारे सुधारणा.