माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १९:
विदेशी प्रमाणन प्राधिकरणांना मान्यता :
१) विनियमांद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आल्या असतील अशा शर्तीना आणि निर्बधांना अधीन राहून, नियंत्रकाला, केंद्र शासनाच्या पूर्वमान्यतेस अधीन राहून आणि राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून कोणत्याही विदेशी प्रमाणन प्राधिकरणाला या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी प्रमाणन प्राधिकरण म्हणून मान्यता देता येईल.
२) पोटकलम (१) अन्वये कोणत्याही प्रमाणन प्राधिकरणाला मान्यता देण्यात आली असेल अशा बाबतीत, अशा प्राधिकरणाने दिलेले १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी विधिग्राह्य असेल.
३) कोणत्याही प्रमाणन प्राधिकरणाला पोटकलम (१) अन्वये ज्या शर्ती व निर्बंधांना अधीन राहून मान्यता दिली होती. त्यापैकी कोणत्याही शर्तीचा किंवा निर्बंधाचा त्याने भंग केला आहे याबाबत नियंत्रकाचे समाधान झाले असेल तर तो कारणे लेखी नमूद करून शासकीय राजपत्रात अधिूचना प्रसिद्ध करून ती मान्यता रद्द करू शकेल.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.