IT Act 2000 कलम १० : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या) संबंधात नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १० :
१.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या) संबंधात नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार :
केंद्र शासनाला या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, नियमाद्वारे-
(a)क) अ) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा प्रकार;
(b)ख) ब) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ज्या प्रकारे व ज्या स्वरूपात जोडता येईल ती रीत व स्वरूप;
(c)ग) क) १.(इलेक्ट्रॉनिक सही) जोडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे सोपे जाईल अशी रीत व कार्यपद्धती;
(d)घ) ड) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची नियंत्रण प्रक्रिया आणि त्यांची सचोटी, सुरक्षा व गोपनीयता याबाबतची पुरेशी खात्री देणारी प्रक्रिया आणि
(e)ङ) ई) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरला) कायदेशीर स्वरूप देण्यासाठी आवश्यक ती इतर कोणतीही बाब विहित करता येईल.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.

Leave a Reply