IT Act 2000 कलम १०क : १.(इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केलेल्या संविदांची वैधता :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १०क :
१.(इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केलेल्या संविदांची वैधता :
एखादी संविदा करताना जेव्हा प्रस्ताव कळविणे, प्रस्ताव स्वीकृत करणे, प्रस्ताव रद्द करणे व स्वीकृत करणे या गोष्टी इलेक्ट्रॉनिक नमुन्यात किंवा यथास्थिती, इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या साधनांद्वारे व्यक्त केल्या असतील, तेव्हा अशी संविदा अशा इलेक्ट्रॉनिक नमुन्याचा किंवा इलेक्ट्रॉनकि साधनांचा त्या प्रयोजनार्थ वापर केला होता केवळ या कारणावरून अंमलबजावणी करण्यायोग्य नाही असे मानण्यात येणार नाही.)
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ९ द्वारे दाखल.

Leave a Reply