भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४७१ :
बनावट दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) खरा म्हणून वापरतो :
(See section 340(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावट असल्याचे माहीत असलेला बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरणे.
शिक्षा :अशा दस्तऐवजाच्या बनावटीकरणाबद्दलची शिक्षा.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
अपराध : बनावट दस्तऐवज हा केंद्र शासनाची वचनचिट्ठी असल्यास.
शिक्षा :अशा दस्तऐवजाच्या बनावटीकरणाबद्दलची शिक्षा.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
जो दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) बनावट असल्याचे स्वत:ला माहीत आहे, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण आहे, असा कोणताही १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) दस्तऐवज जो कोणी कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणे खरा म्हणून वापरील त्याला, जणू काही त्याने अशा दस्तऐवजाबाबत १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाबाबत) बनावटीकरण केलेले असावे त्याप्रमाणे तीच शिक्षा होईल.
———
१.सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे मूळ मजकुराऐवजी १७-१०-२००० पासून घातला.
