Site icon Ajinkya Innovations

Ipc कलम ४६२ : जिच्याकडे अभिरक्षेचे काम सोपविले आहे त्या व्यक्तीने असा अपराध केला असता त्याबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४६२ :
जिच्याकडे अभिरक्षेचे काम सोपविले आहे त्या व्यक्तीने असा अपराध केला असता त्याबद्दल शिक्षा :
(See section 334 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आतमध्ये कोणतीही मालमत्ता असलेले किंवा ज्याच्या आत ती आहे असा समज असेल असे कोणतेही बंध पात्र सोपवण्यात आलेले असताना ते कपटपणाने उघडणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
ज्यामध्ये मालमत्ता आहे किंवा ज्यात आहे असे स्वत: समजतो असे कोणतेही बंद पात्र स्वत:कडे विश्वासाने सोपविण्यात आले असून, ते उघडण्याचा प्राधिकार स्वत:ला नसताना जो कोणी अप्रामाणिकपणाने किंवा आगळीक करण्याच्या उद्देशाने ते पात्र फोडून किंवा सोडून उघडील त्याला, तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Exit mobile version