Site icon Ajinkya Innovations

Ipc कलम ४३८ : विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे केलेल्या कलम ४३७ मध्ये वर्णन केलेल्या आगळिकीबद्दल शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४३८ :
विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे केलेल्या कलम ४३७ मध्ये वर्णन केलेल्या आगळिकीबद्दल शिक्षा:
(See section 327(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मागील कलमात वर्णिलेली आगळीक विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे करण्यात आल्यास.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी, विस्तव किंवा कोणताही स्फोटक पदार्थ याच्याद्वारे लगतपूर्व कलमामध्ये वर्णन केलेली अशी आगळीक करील, किंवा अशी आगळीक करण्याचा प्रयत्न करील त्याला १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची द्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version