Ipc कलम ४९५ : ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवल्याने तोच अपराध घडतो :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४९५ :
ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवल्याने तोच अपराध घडतो :
(See section 82(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून, पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवण्याने घडणारा तोच अपराध.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी नंतरचा विवाह ज्या व्यक्तीबरोबर झाला आहे त्या व्यक्तीपासून पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवून त्याद्वारे लगतपूर्व कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध करील त्याला दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply