Ipc कलम ४६५ : बनावटीकरणाबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४६५ :
बनावटीकरणाबद्दल शिक्षा :
(See section 336(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावटीकरण
शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
जो कोणी बनावटीकरण करील त्याला, दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply