Ipc कलम ४५७ : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा, घरफोडी (गृह-भेदन) :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४५७ :
कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा, घरफोडी (गृह-भेदन) :
(See section 331(2) and (4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा :५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : तो चारीचा अपराध असल्यास.
शिक्षा :१४ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण करील, किंवा रात्रीच्या वेळी घरफोडी करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जो अपराध करण्याचा त्याचा उद्देश असेल तो अपराध म्हणजे चोरी असेल तर कारावासाची मुदत चौदा वर्षेपर्यंत वाढवता येईल.

Leave a Reply