भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४३१ :
सार्वजनिक रस्ता, पूल, नदी किंवा कालवा याची खराबी करुन आगळीक करणे:
(See section 326(b) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक रस्ता, पूल, नाव्य नदी किंवा नाव्य कालवा याची खराबी करुन आणि प्रवास करण्याच्या किंवा मालमत्तेची ने – आण करण्याच्या दृष्टीने तो नादुरुस्त करुन किंवा त्याची सुरक्षितता कमी करुन आगळीक करणे.
शिक्षा :५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
ज्या कृतीमुळे कोणताही सार्वजनिक रस्ता, पूल नाव्य नदी अथवा नैसर्गिक किंवा कृत्रिम नाव्य नहर प्रवास करण्याच्या किंवा मालमत्तेची ने-आण करण्याच्या दृष्टीने दुस्तर होतो, किंवा त्या दृष्टीने त्याची सुरक्षितता कमी होते, किंवा जिच्यामुळे तसे होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशी कोणतीही कृती करुन जो कोणी आगळीक करील त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.