भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४२८ :
दहा रुपये किमतीच्या जनावरास ठार मारुन किंवा विकलांग करुन आगळीक करणे:
(See section 325 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : १० रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या कोणत्याही जनावरास ठार मारुन त्याच्यावर विषप्रयोग करुन, त्याला विकलांग करुन किंवा निरुपयोगी करुन आगळीक करणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जनावरांचा मालक
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी दहा रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे एखादे जनावर किंवा जनावरे यांना ठार मारुन, विषप्रयोग करुन, विकलांग करुन किंवा नियुपयोगी करुन आगळीक करील त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.