Ipc कलम ४११ : अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४११ :
अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे:
(See section 317(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचचे माहीत असताना ती अप्रामाणिकपणे स्वीकारणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : चोरीच्या संपत्तीचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
कोणतीही चोरीची मालमत्ता, ती चोरीची मालमत्ता आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवून घेईल, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply