भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३ :
जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा :
(See section 1(4) of BNS 2023)
१.(भारताबाहेर) केलेल्या अपराधाबद्दल २.(कोणत्याही भारतीय कायद्यानुसार) केली जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर तिने १.(भारताबाहेर) केलेल्या कृतीबद्दल जणू काही अशी कृती ३.(भारतामध्ये) केलेली होती असे समजून या संहितेच्या (कायद्याच्या) उपबंधानुसार (तरतुदीनुसार) कारवाई केली जाईल.
———
१. क्रमश: अनुकूलन आदेश १९३७, अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे उक्त राज्यक्षेत्रांच्या मर्यादांच्या बाहेर हे मूळ शब्द वरीलप्रमाणे विशोधित करण्यात आले.
२. अनुकूलन आदेश १९३७ याद्वारे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया-इन-कौन्सिल याने संमत केलेल्या कोणत्याही कायद्यानुसार याऐवजी घातले.
३. क्रमश: अनुकूलन आदेश १९३७, अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे उक्त राज्यक्षेत्र हे मूळ शब्द वरीलप्रमाणे विशोधित करण्यात आले.