Ipc कलम ३३९: गैरनिरोध :

भारतीय दंड संहिता १८६०
गैरनिरोध व परिरोध यांविषयी :
कलम ३३९:
गैरनिरोध :
(See section 126 of BNS 2023)
कोणत्याही व्यक्तीस ज्या दिशेने जाण्याचा हक्क असेल अशा कोणत्याही दिशेने जाण्यास तिला जो कोणी इच्छापूर्वक अटकाव करतो त्या व्यक्तीस गैरपणे निरुद्ध करतो असे म्हटले जाते.
अपवाद :
जमीन किंवा पाणी यावरील ज्या खाजगी भागात (मार्गात) असा अटकाव करण्याचा आपणास कायदेशीर हक्क आहे असे एखादी व्यक्ती सद्भावपूर्वक समजत असेल त्या मार्गामध्ये असा अटकाव करणे हा या कलमाच्या अर्थानुसार अपराध नाही.
उदाहरण :
(य) ला ज्या मार्गावरुन जाण्याचा हक्क आहे तो मार्ग बंद करण्याचा आपणांस हक्क आहे असे (क) सद्भावपूर्वक समजत नसताना तो मार्ग अडवतो. त्यामुळे (य) ला त्या मार्गाने जाण्यास प्रतिबंध होतो. (क) हा (य) ला गैरपणे निरुद्ध करतो.

Leave a Reply