भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १३ :
वजने व मापे यासंबंधीच्या अपराधांविषयी :
कलम २६४ :
वजन करण्यासाठी खोट्या साधनाचा कपटपूर्ण वापर करणे :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : वजन करण्यासाठी खोट्या साधनाचा कपटपूर्ण वापर.
शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
वजन करण्याचे जे कोणतेही साधन खोटे असल्याचे स्वत:ला माहीत आहे ते जो कोणी कपटीपणाने वापरील त्याला, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.