भारतीय दंड संहिता १८६०
कलम २०२ :
अपराधाची माहिती देण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळणे:
(See section 239 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराधाची माहिती देण्यास विधित: बद्ध असलेल्या व्यक्तीने माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळणे.
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
अपराध घडला आहे हे माहीत असून किंवा तसे समजण्यास कारण असून, जो कोणी त्या अपराधाविषयी जी माहिती देण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) आहे अशी कोणतीही माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळील त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.