Ipc कलम १५९ : दंगल (मारामारी) :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १५९ :
दंगल (मारामारी) :
(See section 194(1) of BNS 2023)
जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवितात तेव्हा, त्यांनी दंगल केली (मारामारी) असे म्हटले जाते.

कलम १६० :
दंगल (मारामारी) करण्याबद्दल शिक्षा :
(See section 194(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दंगल करणे.
शिक्षा :१ महिन्यांचा कारावास, किंवा १०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
————
जो कोणी दंगल (मारामारी) करील त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा शंभर रूपये द्रव्यदंडापर्यंत किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply