भारतीय दंड संहिता १८६०
कलम १४६ :
दंगा करणे :
(See section 191(1) of BNS 2023)
जेव्हा जेव्हा बेकायदेशीर जमावाकडून किंवा त्याच्या कोणत्याही घटकाकडून (सभासदाकडून) अशा जमावाचे समान उद्दिष्ट साधण्यासाठी बलप्रयोग किंवा हिंसाचार होतो, तेव्हा अशा जमावाचा प्रत्येक घटक (सभासद) दंग्याच्या अपराधाबद्दल दोषी असतो.
कलम १४७ :
दंगा करण्याबद्दल शिक्षा:
(See section 191(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दंगा करणे.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
———-
जो कोणी दंगा करण्याबद्दल दोषी असेल त्यास दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
कलम १४८ :
प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे:
(See section 191(3) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
————
एखाद्या प्राणघातक हत्यारानिशी किंवा जी वस्तू हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरली असता मृत्यूस कारण होणे संभवनीय आहे अशा कोणत्याही वस्तूनिशी सज्ज होऊन दंगा केल्याबद्दल जो कोणी दोषी असेल तर त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.