Ipc कलम ११५ : मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपप्रेरण (चिथावणी) अपराध न घडल्यास :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ११५ :
मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपप्रेरण (चिथावणी) अपराध न घडल्यास :
(See section 55 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यूच्या किंवा आजीवन करावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपप्रेरण – अपप्रेरणाच्या परिणामी अपराध न घडल्यास.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
————-
अपराध : अपप्रेरणाच्या परिणामी अपाय करणारी कृती केली गेल्यास.
शिक्षा :१४ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
————–
जो कोणी मृत्यूच्या किंवा १.(आजीवन कारावासाच्या) शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्यास,जर अशा अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून प्रत्यक्षात तो अपराध घडला नाही आणि अशा अपप्रेरणाबद्दल (चिथावणीबद्दल) शिक्षेकरिता स्पष्ट तरतुद नसेल, तर सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
परिणामी अपाय करणारी कृती केली गेल्यास :
आणि अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून ज्याबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) दायी होतो, व ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत होते अशी कोणतीही कृती करण्यात आली तर, अपप्रेरक (चिथावणी देणारा) चौदा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
उदाहरण :
(य) चा खून करण्यास (क) हा (ख) ला चिथावणी देतो. अपराध केला जात नाही. (ख) ने (य) चा खून केला असता तो मृत्यूच्या किंवा १.(आजीवन कारावासाच्या) शिक्षेस पात्र झाला असता. म्हणून (क) सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि द्रव्यदंडासही पात्र आहे; आणि जर अपप्रेरणाचा परिणाम म्हणून (ख) ला कोणतीही दुखापत झाली तर, (क) चौदा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रव्यदंडासही पात्र होईल.
———
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी दाखल करण्यात आले. (१-१-१९५६ रोजी व तेव्हापासून)

Leave a Reply