- « भारतीय दंड संहिता १८६० मराठी : प्रकरण २३ : अपराध करण्याच्या प्रयत्नाविषयी : कलम ५११
- भारतीय दंड संहिता १८६० मराठी : प्रकरण ५-अ : फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) : कलम १२०- अ : फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) याची व्याख्या : »
प्रकरण ६ : राज्यविरोधी अपराधांविषयी : कलम १२१ : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे- तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चिथावणी देणे :
भारतीय दंड संहिता १८६० मराठी :
प्रकरण ६ : राज्यविरोधी अपराधांविषयी :
कलम १२१ : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे- तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चिथावणी देणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :मृत्यू किंवा आजन्म कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
जो कोणी भारत सरकारविरुद्ध युद्ध करील, किंवा तसे करण्याचा प्रयत्न करील, किंवा तसे करण्यास चिथावणी देईल; त्याला मृत्यूची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यसंडासही पात्र होईल.
कलम १२१- अ : कलम १२१ प्रमाणे शिक्षापात्र असे अपराध करण्याचा कट :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.

जो कोणी कलम १२१ प्रमाणे शिक्षापात्र असलेल्यांपैकी कोणताही अपराध करण्याचा कट भारताच्या आत किंवा बाहेर करील, किंवा केंद्र शासनास, अगर राज्य शासनास फौजदारीपात्र बलप्रयोगाद्वारे अगर त्याचा देखावा करून दहशत घालण्याचा कट करील - त्याला आजन्म कारावासाची शिक्षा किंवा दहा वर्षेपावेतो इतक्या मुदतीची कोणत्याही कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण : कटाचा अपराध करण्याकरिता त्याला अनुसरून एखादी कृती किंवा अवैध अकृती घडून आली पाहिजे, अशी या कलमाखाली जरूरी नाही.
कलम १२२ : भारत सरकारविरूध्द युध्द करण्याच्या उद्देशाने शस्त्रे इत्यादी गोळा करणे :

जो कोणी भारत सरकारविरूध्द युध्द करण्याच्या किंवा युध्द करण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने माणसे- शस्त्रे - किंवा दारूगोळा गोळा करील अथवा युध्दाची पूर्वतयारी करील-त्याला आजन्म कारावासाची किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे इतक्या मुदतीची कोणत्याही कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कलम १२३ : युध्द करण्याचा बेत ते सोपे व्हावे म्हणून लपविणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :१० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.

जर कोणी कृती अगर अकृती करून भारत सरकारविरूध्द युध्द करण्याचा बेत अस्तित्वात असल्याचे लपवील आणि अशा लपवणुकीमार्फत असे युध्द सोपे केले जावे असा उद्देश असेल आणि त्यामुळे तसे होण्याचा संभव आहे याची जाणीव असेल, तर त्याला दहा वर्षेपावेतो मुदतीची कोणत्याही कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कलम १२४ : कायदेशीर अधिकार वापरणे अगर रोखण्याकरिता भाग पाडणे आणि त्या उद्देशाने राष्ट्रपती- राज्यपाल इत्यादींवर हल्ला करणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड.

जो कोणी भारताचा राष्ट्रपती किंवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल याला त्यांच्या कायदेशीर अधिकाराचा कोणत्याही रीतीने वापरण्यास किंवा वापरण्याचे टाळावे म्हणून त्याला प्रवृत्त केले जाते, अगर भाग पाडले जाते, किंवा तसा उद्देश असतो. त्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करील-अगर प्रतिबंध हरकत घेईल अगर तसा प्रयत्न करतो अगर बळाचा वापर करून अगर देखावा करून दबाव आणतो अगर प्रयत्न करतो- तर त्यास सात वर्षेपर्यंत इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कलम १२४-अ : राजद्रोह-प्रजाक्षोभन :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :आजीवन कारावास व द्रव्यदंड, किंवा ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड किंवा द्रव्यदंड

जो कोणी भारतामध्ये कायदेशीर स्थापन झालेल्या शासनाबद्दल द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना निर्माण करतो अगर तसा प्रयत्न करतो. अगर अप्रीतीची भावना चेतवितो, अगर प्रयत्न करतो. त्याकरिता तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत अथवा खुणांमार्फत अगर दृश्य देखाव्यामार्फत अथवा अन्य मार्गांचा वापर करतो- तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि सोबत द्रव्यदंड पण लादता येईल अगर तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही कारावासाची शिक्षा होईल.
स्पष्टीकरण १ : अप्रीती या शब्दप्रयोगात द्रोहभावनेचा व शत्रुत्वाच्या भावनांचा समावेश आहे.
स्पष्टीकरण २: शासनाच्या उपाययोजनांमध्ये कायदेशीर मार्गांनी फेरबदल घडवून आणण्याकरता द्वेषाची-तुच्छतेची अगर अप्रीतीची भावना न चेतवता किंवा तसा प्रयत्न न करता त्यांच्याबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही.
स्पष्टीकरण ३: द्वेषाची, तुच्छतेची, किंवा अप्रीतीची भावना न चेतवता, किंवा चेतवण्याचा प्रयत्न न करता शासनाच्या प्रशासकीय किंवा अन्य कारवाईबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही.
कलम १२५ : भारत सरकारशी सलोख्याचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरूध्द युध्द पुकारणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :आजीवन कारावास व द्रव्यदंड, किंवा ७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड किंवा द्रव्यदंड

जो कोणी भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेच्या शासनाविरूध्द युध्द करील, किंवा तसा प्रयत्न करील, किंवा चिथावणी देईल - त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि तिच्यासोबत द्रव्यदंड लादला जाईल किंवा सात वर्षेपावेतो असू शकेल इतकी कोणत्याही प्रकारची कारावासाची शिक्षा होईल व सोबत द्रव्यदंड लादला जाईल किंवा द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
कलम १२६ : भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड, आणि काही मालमत्ता जप्त

जो कोणी भारत सरकारशी मैत्रीचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रामध्ये लूटमार करील किंवा तशी तयारी करेल- त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंड आणि याशिवाय अशी लूटमार करताना वापरलेल्या किंवा वापरण्याच्या योजलेल्या अथवा अशा लूटमारीत मिळालेल्या कोणत्याही मालमत्ता सरकारजमा करण्यासही पात्र असेल.
कलम १२७ : वर कलम १२५,१२६ मध्ये दर्शविलेल्या युध्दात अगर लूटमारीत हस्तगत झालेली मिळकत स्वीकारणे:

जो कोणी एखादी मालमत्ता कलम १२५-१२६ मधील घडलेल्या अपराधात हस्तगत करण्यात आलेली आहे हे माहीत असताना ती स्वीकारील, तर त्यास सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंड, आणि स्वीकारलेली मालमत्ता सरकारजमा होईल.
कलम १२८ : राजकैद्याला अगर युध्दकैद्याला पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा देणे :

जो कोणी लोकसेवक असून, आणि त्याच्याकडे कोणत्याही राजकैद्याचा अगर युध्दकैद्याचा ताबा असतो (हवालत )आणि जेथे अशा कैद्याला बंदिवासात ठेवले असेल, अशा कोणत्याही ठिकाणाहून अशा कैद्यास पळून जाण्यास इच्छापूर्वक मुभा देईल- तर, त्यास आजन्म कारावासाची, किंवा दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कलम १२९ : लोकसेवकाने हयगयीने अशा कैद्याला पळून जाऊ देणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :३ वर्षाचा साधा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
जो कोणी लोकसेवक असून आणि त्याच्या स्वत:कडे कोणत्याही राजकैद्याची अगर युध्दकैद्याची हवालत असताना जेथे अशा कैद्याला हयगयीने पळून जाऊ देईल, तर त्यास तीन वर्षेपावेतो असू शकेल इतकया मुदतीची साध्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
कलम १३० : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा बेकायदेशीरपणे सोडवणे किंवा आसरा देणे:

जो कोणी जाणीवपूर्वक कोणत्याही राजकैद्याला किंवा युध्दकैद्याला कायदेशीर हवालतीमधून पळून जाण्यास मदत करील किंवा सहाय्य देईल; तसेच अशा कैद्याला अवैधपणे सोडवील, अगर तसा प्रयत्न करील, तसेच कायदेशीर हवालतीमधून पळालेल्या अशा कोणत्याही कैद्यास आसरा देईल अगर लपवील. तसेच असा कैदी पुन्हा गिरफदार होत असता त्यास प्रतिकार करील, किंवा तसा प्रयत्न करील तर त्यास,- आजन्म कारावासाची, किंवा दहा वर्षेपावेतो असू शकेल इतक्या कोणत्याही मुदतीची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण : ज्याला भारतात विवक्षित सीमांच्या आत मुक्त संचारासाठी पॅरोलवर परवानगी देण्यात आली आहे, तो राजकैदी अगर युध्दकैदी जर त्याला दिलेल्या हद्दीच्या पलीकडे गेला तर, तो कायदेशीर हवालतीतून पळाला असे म्हटले जाते.
Install IPC in Marathi Free , Full and Offline Android app from below link.

*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.