२४. वाक्य पृथक्करण : मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य
English Grammar in Marathi
२४. वाक्य पृथक्करण : मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य
(Analysis of Complex and Compound Sentences)
मिश्र वाक्य (Complex Sentences) व संयुक्त वाक्य (Compound Sentences) यांचा विचार करताना प्रधान वाक्य व गौन वाक्य यांचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर गौण वाक्य किंवा वाक्ये शोधून त्या प्रत्येक वाक्याचा मुख्य वाक्याशी कोणता संबंध आहे ते पहाणे. शुद्ध वाक्याचे ज्याप्रमाणे पृथक्करण करतो त्याप्रमाणे मुख्य वाक्य व गौण वाक्य किंवा वाक्ये यांचे पृथक्करण करतात.
वाक्य पृथक्करणाचे काही नियम पुढील प्रमाणे :
१. वाक्यातील क्रियापदे शोधने व तेवढेच clause वाक्यात सापडतात.
अपवाद : positive degree च्या वाक्यात, comparative degree च्या वाक्यात व as it हे आलेल्या वाक्यात, जेवढी क्रियापदे असतात त्यापेक्षा एक क्रियापद अधिक असते.
२. that ने प्रारंभ झालेल्या clause च्या मागे जेव्हा नाम आले असेल तेव्हा that च्या जागी who or which हे शब्द घालून जर वाक्य सुसंगत वाटत असेल तर त्या that चा clause Adjective clause असतो व ते वाक्य सुसंगत वाटत नसेल, तर तो clause Noun clause in opposition असतो.
३. गौण वाक्याची जात केव्हाही जोड संबंधी connective वरुन ठरवत नाही.
४. where या connective च्या मागे जर स्थलवाचक विशेषनाम असेल तर where and there अशी फोड करतात.
५. than ने सुरु होणाऱ्या clause मध्ये than च्या पुढे जर संबंधी सर्वनाम असेल तर than चा clause हा Adjective clause असतो.
६. Compound sentence मध्ये पुढील connectives येतात :
otherwise, else, nevertheless, where as, while, than, either-or, neither-nor, therefore, so, for, and, but, both, as well as, not only but also, no less than इत्यादी.
७. Complex sentence मध्ये पुढील connectives येतात :
who, which, not, withstanding, that, where, when, why, how, though, than, that, as because,since, so, that, if, unless, whether इत्यादी.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.