२३. वाक्य पृथक्करण : शुद्ध वाक्य (Analysis of Simple..
English Grammar in Marathi
२३. वाक्य पृथक्करण : शुद्ध वाक्य
(Analysis of Simple Sentences)
प्रत्येक वाक्याचे उद्देश्य (Subject) आणि विधेय (Predicate) असे दोन भाग असतात. जेव्हा एखाद्या वाक्याचे सर्व विभाग कोणते पडतात हे दर्शविले जाते त्यास वाक्यपृथक्करण (Analysis of sentences) असे म्हणतात.
वाक्याचे भाग व त्यांचे उपविभाग पुढील प्रमाणे :
१. मूळ उद्देश्य (Subject Word / Simple Subject) :
ज्या शब्दावाचून उद्देश्य बनने शक्य नाही त्यास मूळ उद्देश्य (Subject Word) किंवा केवळ उद्देश्य (Simple Subject) असेही म्हणतात.
उदाहरणार्थ :
The little boy is my brother.
या वाक्यात the little boy हे संपूर्ण उद्देश्य (Complete Subject) आहे, पण boy हे मूळ उद्देश्य आहे.
त्यामुळे वरील वाक्याचे The little boy हे उद्देश्य व is my brother हे विधेय असे पुथक्करण होईल.
२. मूळ विधेय (Predicate Word) :
ज्या शब्दावाचून विधेय बनणे शक्य नाही त्यास मूळ विधेय असे म्हणतात, त्यास केवळ विधेय असेही म्हणतात. संपूर्ण विधेय मधून मूळ विधेय बाजूला केले तर बाकीचे विधेय उरते.
उदाहरणार्थ :
The boy writes his note-book.
वरील वाक्यात The boy हे उद्देश्य, writes (क्रियापद) मूळ विधेय व his note-book उर्वरित विधेय आहे.
३. उद्देश्य विस्तार (Enlargement of the subject) :
मूळ उद्देशाशी संबंधित शब्दांना उद्देश्यविस्तार म्हणतात.
उदाहरणार्थ :
White oxen look very fine.
वरील वाक्यात Oxen हे मूळ उद्देश्य, white हे उद्देश्यविस्तार, look हे (क्रियापद) मूळ विधेय व very fine हे उर्वरित विधेय आहे.
४. विधेय विस्तार (Enlargement of the predicate) :
मूळ विधेयाशी संबंधीत असलेल्या शब्दांना विधेय विस्तार असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Rama will buy a car tomorrow.
वरील वाक्यात Rama हे मूळ उद्देश्य, या मध्ये उद्देश्य विस्तार नाही, will buy (क्रियापद) मूळ विधेय, tomorrow हे विधेय विस्तार व a car उर्वरित विधेय आहे.
५. कर्मविस्तार (Enlargement of the object) :
वाक्यातील कर्माशी संबंधित शब्दांना कर्मविस्तार असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
The clever parrot dropped many pebbles in to the jug.
वरील वाक्यात Parrot हे मूळ उद्देश्य, The clever हे उद्देश्य विस्तार, dropped (क्रियापद), pebble (कर्म), many (कर्म विस्तार) हे मूळ विधेय व in to the jug हे विधेय विस्तार आहे.
६. पूरक (The complement) :
To be, to seem, to call ही अपूर्ण क्रियापदे आहेत, स्वत:चा अर्थ पूर्ण करण्यासाठी पुरकाची आवश्यकता असते.
उदाहरणार्थ :
I call my cat Mani.
वरील वाक्यात I हे मूळ उद्देश्य, call (क्रियापद) , cat (कर्म), my (कर्मविस्तार), Mani (पूरक) हे विधेय आहे.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.