२१. वाक्य पृथक्करण : (Analysis)
English Grammar in Marathi
२१. वाक्य पृथक्करण :
(Analysis)
पुर्ण अर्थ करणाऱ्या वाक्यास वाक्य असे म्हणतात. प्रत्येक वाक्यात शब्दसमुहास अर्थाच्या दृष्टीने क्रियापद असते परंतु काही शब्दसमुह वाक्यात वापरलेले असतात त्याशब्दसमुहात कर्ता किंवा क्रियापद नसते व ते स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ व्यक्त करु शकत नाहीत अशा शब्दसमुहास वाक्यांश (Phrase)असे म्हणतात. तसेच काही शब्दसमूह वाक्याचा भाग असतात, त्यामध्ये कर्ता व क्रियापद दोन्ही असते व अर्थही व्यक्त करतात, परंतु तरीसुद्धा वाक्यातील इतर शब्दसमुहांवर अवलंबून असतात. त्यांना पोटवाक्य(Clause)असे म्हणतात.
प्रधान वाक्य (Principle or Main Clause) :
सर्वसाधारणपणे प्रधान वाक्याच्या सुरुवातीला जोड-संबंधी Connective नसते. असलेच तर but, and, so, therefore, for , either-or, neither-nor ही नेहमी वापरली जाणारी उभयान्वयी अव्यये असतात.
या प्रकारच्या वाक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण होतो व वाक्य संपताच शेवटी पुर्णविराम देतात.
गौण वाक्य (Subordinate Clause) :
गौण वाक्याच्या सुरुवातीला काही तरी जोड-संबंधी Connective असतेच एखादे वेळी ते गुप्त स्वरुपा असते. परंतु त्या जोड-संबंधी Connective मुळे वाकयाचा अर्थ पुर्ण होत नाही. व वाक्याच्या शेवटी पुर्णविराम देता येत नाही.
गौण वाक्य हे मोठ्या वाक्याचा घटक (भाग) असते.
उदाहरणार्थ :
Rama got the first prize because he had worked hard.
वरील वाक्यात हा एक Rama got the first prize व he had worked hard हा एक clause आहे व ते वरील वाक्याचे भाग आहेत. दोन्ही clause मध्ये कर्ता व क्रियापद आहे. दोन्ही वाक्य मिळून संपूर्ण वाक्य तयार झाले आहे.
वाक्यांश (Phrase):
वाक्यांश हा शब्दांचा गट असतो. तो एका वाक्याचा घटक असतो. त्यामध्ये कर्ता व क्रियापद नसते.
उदाहरणार्थ :
Mr. John works in the morning.
वरील वाक्यात हा in the morning वाक्यांश आहे त्यामध्ये कर्ता व क्रियापद नाही व त्यामुळे वाक्याचा अर्थ पुर्ण होत नाही.
वाक्यपृथक्करणाच्या दृष्टीने वाक्याचे चार प्रकार पडतात.
१. साधे वाक्य (A Simple Sentence):
साध्या वाक्यामध्ये एकच कर्ता व एकच क्रियापद असते. ते क्रियापद मर्यादित किंवा परिमीत असते.
उदाहरणार्थ :
Rama goes to see a movie.
या वाक्यात Rama हा एकच कर्ता आहे व goes हे एकच क्रियापद आहे goes हे मर्यादित क्रियापद आहे. हे क्रियापद कर्ता प्रमाणे बदलते. व to see हे अमर्यादित क्रियापद आहे. कारण काळ बदलला तरी यामध्ये बदल होत नाही.
उदाहरणार्थ :
Rama went to see a movie.
जर वाक्यात दोन कर्मे असून एकच कल्पना किंवा एकच विचार मांडला असेल तर त्या वाक्यासही साधे वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ :
Suresh and Ramesh went to Mumbai.
या वाक्यात दोघे मिळून मुंबईला गेले ही कल्पना स्पष्ट होते.
२. मिश्र वाक्य (A Complex Sentence) :
या प्रकारच्या वाक्यात एकच मुख्य वाक्य असते व बाकीची सर्व गौण वाक्ये असतात. या प्रकारच्या वाक्यात गौण वाक्यांना मर्यादा नसते.
उदाहरणार्थ :
Rama did not go to school because he was ill.
वरील वाक्यात because he was illगौण वाक्य आहे.
३. संयुक्त वाक्य (A Compound Sentence) :
या प्रकारच्या वाक्यात दोन अथवा दोनपेक्षा अधिक प्रधान वाक्य असतात. गौण वाक्यांची येथे आवश्यकता नसते. ही Co-ordinate conjunction समान दर्जाच्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
उदाहरणार्थ :
Prakash went to Poona and Rama went to Poona and Hari went to Poona.
वरील वाक्यात तीनही वाक्य प्रधान आहेत. आणि ती and या Co-ordinate conjunction ने जोडलेली आहेत.
४. संयुक्त - मिश्र वाक्य (Compund - Complex Sentence) :
ज्या दोन वाक्यात दोन स्वतंत्र वाक्ये असतात त्या वाक्यास Double Sentences दुहेरी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
United we stand and divided we fall.
वरील वाक्यात United we stand व divided we fall ही दोन्ही स्वतंत्र वाक्या आहेत येथे गौण वाक्य नाही.
ज्या वाक्यात तीन किंवा तीनपेक्षा अधिक प्रमुख वाक्ये व एक किंवा अनेक गौण वाक्ये असतात त्यांना संयुक्त - मिश्र वाक्य म्हणतात. कारण या वाक्यात संयुक्त वाक्य व मिश्र वाक्य या दोहोंची वैशिष्ट्ये दिसतात.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.