अनुच्छेद ३०५ : विद्यमान कायदे ..कायदे यांची व्यावृत्ती :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद ३०५ :
१.(विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची व्यावृत्ती :
अनुच्छेद ३०१ व ३०३ यांमधील कोणत्याही गोष्टीमुळे, कोणत्याही विद्यमान कायद्याच्या तरतुदींवर, राष्ट्रपती आदेशाद्वारे अन्यथा निदेश देईल तेवढे खेरीजकरून एरव्ही, प्रभावी होणार नाही आणि अनुच्छेद ३०१ मधील कोणत्याही गोष्टीमुळे, संविधान (चौथी सुधारणा) अधिनियम, १९५५ याच्या प्रारंभापूर्वी केलेला कोणताही कायदा हा, अनुच्छेद १९, खंड (६), उपखंड (दोन) मध्ये निर्देशिलेल्या अशा कोणत्याही बाबीशी संबंधित असेल तेथवर, त्याच्या प्रवर्तनावर प्रभावित होणार नाही, अथवा त्या बाबीशी संबंधित असा कोणताही कायदा करण्यास संसदेला किंवा राज्याच्या विधानमंडळाला प्रतिबंध होणार नाही.)
----------
१. संविधान (चौथी सुधारणा) अधिनियम, १९५५ याच्या कलम ४ द्वारे मूळ अनुच्छेद ३०५ ऐवजी दाखल केला.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.