अनुच्छेद २४३ छ : पंचायतिचे अधिकार, ..आणि जबाबदाऱ्या :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद २४३ छ :
पंचायतिचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :
या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंळळ, कायद्याद्वारे,पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे, या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार देऊ शकेल आणि,----
(क) आर्थिक विकास व सामाजिक न्याय यांसाठी योजना तयार करण्याच्या ;
(ख) अकराव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या बाबींच्या संबंधातील योजनांसहित त्यांच्याकडे सोपविण्यात येतील अशा, आर्थिक विकास व सामाजिक न्यायविषयक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या, बाबतीत या कायद्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींना अधीन राहून, योग्य त्या पातळीवरील पंचायतींना अधिकार व जबाबदाऱ्या सोपविण्याच्या तरतुदींचा अशा कायद्यामध्ये अंतर्भाव करू शकेल.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.