अनुच्छेद १९५ : सदस्यांचे वेतन व भत्ते :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद १९५ :
सदस्यांचे वेतन व भत्ते :
राज्याच्या विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य हे, राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्याला व त्याबाबत याप्रमाणे तरतूद होईपर्यंत, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी तेथील संबंधित असलेल्या प्रांताच्या विधानसभेच्या सदस्यांच्या बाबतीत लागू असलेल्या अशा दरांनी व अशा शर्तींवर, वेतन व भत्ते मिळण्यास हक्कदार असतील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.