अनुच्छेद १५१ : लेखापरीक्षा अहवाल :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद १५१ :
लेखापरीक्षा अहवाल :
(१) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे संघराज्याच्या लेख्यांविषयीचे अहवाल, राष्ट्रपतीस सादर केले जातील व तो ते संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करील.
(२) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याचे एखाद्या राज्याच्या लेख्यांविषयीचे अहवाल, त्या राज्याच्या राज्यपालास १.*** ंसादर केले जातील व तो ते राज्याच्या विधानमंडळासमोर ठेवण्याची व्यवस्था करील.
---------------
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुखास हे शब्द गाळले.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.