अनुच्छेद ११३ : अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद ११३ :
अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती :
(१) अंदाजपत्रकांपैकी जेवढा भाग, भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग संसदेच्या मतास टाकला जाणार नाही, पण संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात ज्यांपैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे, असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही.
(२) उक्त अंदाजपत्रकांपैकी जेवढा भाग अन्य खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग, अनुदानार्थ मागण्यांच्या रूपाने लोकसभेला सादर केला जाईल आणि लोकसभेस कोणत्याही मागणीस अनुमती देण्याचा किंवा अनुमती नाकारण्याचा किंवा तीत विनिर्दिष्ट केलेल्या रकमेत कपात करून त्या मागणीस अनुमती देण्याचा अधिकार असेल.
(३) कोणतीही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.