Tag: "भारतीय राज्यघटना"
अनुच्छेद ३९२ : अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
राज्यघटना
अनुच्छेद ३९२ :
अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
(१) कोणत्याही अडचणी, विशेषत:, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ मधील तरतुदींचे या संविधानाच्या तरतुदींप्रत संक्रमण करण्यासंबंधीच्या अडचणी दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, राष्ट्रपती, आदेशाद्वारे असा निदेश देऊ शकेल की, त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीत हे संविधान, त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा अनुकूलनांसह प्रभावी होईल---मग ती अनुकूलने, फेरबदल करून वा त्यात भर घालून केलेली असोत वा काहीतरी वगळून केलेली असोत:
परंतु असे की, असा कोणताही आदेश भाग पाचच्या प्रकरण दोन अन्वये रीतसर घटित झालेल्या संसदेच्या प्रथम अधिवशेनानंतर काढला जाणार नाही.
(२) खंड (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, संसदेपुढे मांडला जाईल.
(३) या अनुच्छेदाद्वारे, अनुच्छेद ३२४ द्वारे, अनुच्छेद ३६७ चा खंड (३) द्वारे व अनुच्छेद ३९१ द्वारे राष्ट्रपतीला प्रदान केलेले अधिकार, या संविधानाच्या प्रारंभापूर्वी, डोमिनिअन ऑफ इंडियाच्या गव्हर्नर जनरलला वापरता येतील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
अनुच्छेद ३९३ : संक्षिप्त नाव :
राज्यघटना
भाग बावीस :
संक्षिप्त नाव, प्रारंभ १(प्राधिकृत हिंदी पाठ) व निरसने :
अनुच्छेद ३९३ :
संक्षिप्त नाव :
या संविधानास भारताचे संविधान असे म्हणावे.
-------
१. संविधान (अठ्ठावन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८७ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
अनुच्छेद ३९४ : प्रारंभ :
राज्यघटना
अनुच्छेद ३९४ :
प्रारंभ :
हा अनुच्छेद व अनुच्छेद ५, ६, ७, ८, ९, ६०, ३२४, ३६६, ३६७, ३७९, ३८०, ३८८, ३९१, ३९२, व ३९३ तात्काळ अंमलात येतील आणि या संविधानाच्या बाकीच्या तरतुदी, या संविधानात, या संविधानाच्या प्रारंभाचा दिन म्हणून जो निर्देशिलेला आहे, त्या
२६ जानेवारी १९५० या दिवशी अंमलात येतील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
अनुच्छेद ३९४-क : हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ :
राज्यघटना
अनुच्छेद ३९४-क :
हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ :
१.((१) राष्ट्रपती आपल्या प्राधिकारान्वये,------
(क) संविधान सभेच्या सदस्यांनी, स्वाक्षरित केलेल्या, केंद्रीय अधिनियमाच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठामध्ये अंगीकृत केलेली भाषा, शैली व परिभाषा यांच्याशी अनुरूप करण्यासाठी आवश्यक असतील असे फेरबदल केलेला आणि अशा प्रसिद्धीपूर्वी ह्या संविधानामध्ये केलेल्या सर्व सुधारणा त्यामध्ये समाविष्ट केलेला या संविधानाचा हिंदी भाषेतील अनुवाद; आणि
(ख) या संविधानाच्या इंग्रजी भाषेमध्ये केलेल्या प्रत्येक सुधारणेचा हिंदी भाषेतील अनुवाद, प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करील.
(२) खंड (१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संविधानाच्या आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेच्या अनुवादास, त्याचा जो मूळ अर्थ असेल त्याप्रमाणे, अन्वयार्थ लावण्यात येईल आणि जर अशा अनुवादाच्या कोणत्याही भागाचा अन्वयार्थ लावण्यामध्ये कोणतीही अडचण उद्भवली तर, राष्ट्रपती, त्यांचे योग्यप्रकारे पुनरीक्षण करण्याची व्यवस्था करील.
(३) या अनुच्छेदामध्ये प्रसिद्ध केलेला या संविधानाचा आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेचा अनुवाद, हा सर्व प्रयोजनांकरता त्याचा हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ असल्याचे मानण्यात येईल.)
-----------
१. संविधान (अठ्ठावन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८७ याच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केला.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
अनुच्छेद ३९५ : निरसने :
राज्यघटना
अनुच्छेद ३९५ :
निरसने :
याद्वारे इंडियन इंडिपेंडन्स अॅक्ट, १९४७ आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ त्याचबरोबर नंतरच्या अधिनियमात सुधारणा करणाऱ्या किंवा त्यास पूरक असलेल्या सर्व अधिनियमिती याद्वारे निरसित करण्यात येत आहेत, पण यात प्रिव्ही कौन्सिल अधिकारिता
निरास अधिनियम, १९४९ याचा समावेश नाही.