हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम ७ :
तरवड, तवज्जे, कुटुंब, कवर किंवा इळ्ळम यांच्या संपत्तीतील हितसंबंधाची प्रक्रांती :
(१) हा अधिनियम पारित झाला नसता तर ज्याला मरुमक्कतायम किवा नंबूदिरी कायदा लागू झाला असता असा एखादा हिंदू या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यू पावला असून त्याच्या किंवा तिच्या मृत्युसमयी, प्रकरणपरत्वे, तरवड, तबज्जे किवा इळ्ळम यांच्या संपत्तीत त्याचा किंवा तिचा हितसंबंध असेल तेव्हा, त्या संपत्तीतील त्याचा किंवा तिचा हितसंबंध या अधिनियमाखाली, प्रकरणपरत्वे .मृत्युपत्रीय किवा अमृत्युपत्रीय उत्तराधिकारानुसार प्रकांत होईल , मरूमक्कतायंम किवा नंबूदिरी कायद्या- नुसार नव्हे.
स्पष्टीकएण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ, एखादा हिंदूचा तरवड, तवज्जे किया इळ्ळम यांच्या संपत्तीतील हितसंबंध. हा, त्याच्या किंवा तिच्या मृत्यूच्या निकटपूर्वी जर, तरवड, तवज्जे किंवा प्रकरणपरत्वे, इळ्ळम यांच्या त्यावेळी हयात असणाऱ्या सर्व घटकव्यक्तींमध्ये त्या संपत्तीची डोईवार वाटणी झाली असती तर, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे आला असता असा, तरवड, तवज्जे किवा प्रकरणपरत्वे, इळ्ळम यांच्या संपत्तीतील हिस्सा असल्याचे मानले जाईल-मग त्याला किंवा तिला लागू असलेल्या मरुमक्कत्तायम किंवा नंबूदिरी कायद्याखाली तो किवा ती अशी वाटणी होण्याची मागणी करण्यास हक्कदार असो वा नसो- आणि असा हिस्सा त्याला किंवा तिला अबाधितपणे वाटून देण्यात आला असल्याचे मानले जाईल.
(२) हा अधिनियम पारित झाला नसता तर ज्याला आळियसंतान कायदा लागू झाला असता असा एखादा हिंदू, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यू पावला असून त्याच्या किंवा तिच्या मत्युसमयी, कुटुंब किंवा प्रकरणपरत्वे, कवर यांच्या संपत्तीत त्याचा किंवा तिचा अविभक्त हितसंबंध असेल तेव्हा, त्या संपत्तीतील त्याचा किंवा तिचा हितसंबंध या अधिनियमाखाली, मृत्युपत्रीय किंवा प्रकरणपरत्वे, अमृत्युपत्रीय उत्तराधिकारानुसार प्रक्रांत होईल, आळियसंतान कायद्यानुसार नव्हे.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजानर्थ, एखाद्या हिंदूचा कुटुंब किंवा कवर यांच्या संपत्तीतील हितसंबंध हा, त्याच्या किंवा तिच्या मृत्यूच्या निकटपूर्वी जर, प्रकरणपरत्वे, कुटुंब किंवा कवर यांच्या त्यावेळी हयात असणाऱ्या सर्व घटक व्यक्तींमध्ये त्या संपत्तीची डोईवार वाटणी झाली असती तर त्याच्या कडे किंवा तिच्याकडे आला असता असा, कुटुंब किंवा प्रकरणपरत्वे, कवर यांच्या संपत्तीमधील हिस्सा असल्याचे मानले जाईल –मग आळियसंतान कायद्याखाली तो किंवा ती अशी वाटणी होण्याची मागणी करण्यास हक्कदार असो वा नसो-आणि असा हिस्सा त्याला किंवा तिला अबाधितपणे वाटून देण्यात आला असल्याचे मानले जाईल.
(३) पोटकलम ( १ ) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेव्हा या अधिनियमाच्या प्रारंभानंतर एखादा स्थानम्दार मृत्यू पावेल तेव्हा, त्याने धारण केलेली स्थानम् संपत्ती जणू काही स्थानम् दाराच्या मृत्यूच्या निकटपूर्वी तो स्वतः व स्थानम्दार ज्या कुटुंबातील असेल त्यातील हयात असलेल्या. सर्व घटकव्यक्ती यांच्यामध्ये डोईवार विभागली गेली होती अशाप्रकारे, ती स्थानम् संपत्ती त्यांच्या कुटुंबातील घटकव्यक्ती व स्थानम् दाराचे वारसदार यांच्याकडे प्रक्रांत होईल, आणि त्यांच्या कुटुंबातील घटकव्यक्ती व स्थानम् दाराचे वारसदार यांच्याकडे येणारे हिस्से ते आपापली स्वतंत्र संपत्ती म्हणून धारण करतील.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ, स्थानम् दाराच्या कुटुंबामध्ये, जर हा अधिनियम पारित झाला नसता तर रूढीने किंवा परिपाठाने जिचे पुरुष-सदस्य स्थानम्दाराच्या स्थानाचे उत्तराधिकारी होण्यास हक्कदार झाले असते अशी त्या कुटुंबाची प्रत्येक शाखा समाविष्ट असेल, मग ती विभक्तः असो किंवा अविभक्त असो.