हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम ६ :
१.(सहदायकी (वारसात) संपत्तीतील हितसंबंध प्रक्रांत होण :
१) या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मिताक्षरा विधि द्वारा शासित एखाद्या संयुक्त हिन्दू कुटूम्बामधील एखादी सहदायकी पुत्री, –
(a)क) जन्मापासून स्वत: स्व अधिकाराने सहदायिक होईल ज्या प्रमाणे पुत्र असेल.
(b)ख) सहदायकी संपत्तिमध्ये तेच अधिकार प्राप्त होतिल जसे जेव्हा ती पुत्र असताना मिळाले असते.
(c)ग) उक्त सहदायकी संपत्तिच्या संबंधात पुत्र समान दायित्वांना अधीन असेल, आणी हिन्दू मिताक्षरा सहदायिकच्या कोणत्याही संदर्भात निर्देशात असे मानले जाईल की त्यासंदर्भात सहदायकी पुत्रीच्या संदर्भात निर्देश सम्मलित असेल :
परंतु या उपकलमामध्ये समाविष्ट असेलेली कोणतीही गोष्ट २० डिसेंबर २००४ च्या पूर्वी झालेल्या मालमत्तेच्या कोणत्याही विभाजन किंवा मृत्यूपत्रीय विल्हेवाट यांस प्रभावित किंवा अवैध करणार नाही.
२) पोट कलम (१) नुसार कोणतीह हिन्दू स्त्री कोणत्याही संपत्तिची हक्कदार बनते, तीच्याकडे सहदायकी स्वामित्व घटानांसह असेल आणि त्या त्या काळी प्रवृत्त कोणत्याही कायद्यामध्ये काहीही असले तरीही, मृत्युपत्रानुसार विल्हेवाटी नुसार ती ग्राह्य धरली जाईल.
३) जेव्हा एखादा हिन्दू पुरुष या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यु पावला असून त्याच्या मृत्युसमयी मिताक्षरा कायद्यानुसार शासित संयुक्त हिन्दू कुटुम्बाच्या संपत्ति मधील त्याचे हित, प्रकरणपरत्वे, या अधिनियमानुसार मृत्युपत्रीय किंवा अमृत्युपत्रीय उत्तराधिकार द्वारा वितरीत केली जाईल, परंतु उत्तरजीवित्वाच्या तत्वानुसार नव्हे आणी सहदायकी संपत्ति अशाप्रकारे विभाजित केली असे समजले जाईल जसे विभाजन झाले होते, आणि –
(a)क) पुत्री किंवा मुलीला, तोच वाटा मिळेल जो पुत्र किंवा मुलाला वाटा दिला जातो;
(b)ख) पुर्व मृत पुत्र किंवा कोणत्याही पूर्व मृत पुत्रीचा अंश (संतान), ज्यांना त्यावेळी प्राप्त झाला असता जर ते विभाजनाच्या वेळी जीवित असते, अशा पूर्व मृत पुत्र किंवा अशा पूर्व मृत पुत्री यांच्या उत्तरजीव संतान (मुलगा / मुलगी) यांच्यात वाटप केला जाइल; आणि
(c)ग) पूर्व मृत पुत्र (मुलगा) किंवा पूर्व मृत पुत्री (मुलगी) यांच्या पूर्व मृत संतान (मुलगा / मुलगी) यांस वाटणीच्या वेळी हक्क मिळाला असता जर ती जिवंत असती, त्याप्रमाणे पूर्व मृत पुत्र किंवा पूर्व मृत पुत्री यांची पूर्व मृत संतान यांची संतान यांस वाटप केला जाईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, हिंदू मिताक्षरा सहदायादाचा हितसंबंध हा त्याच्या मृत्यूच्या निकटपूर्वी जर संपत्तीची वाटणी झाली असती तर त्याला वाटून देण्यात आला असता तेवढा त्या संपत्तीतील हिस्सा असल्याचे मानले जाईल-मग वाटणी होण्याची मागणी करण्यास तो हक्कदार असो वा नसो.
४) हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा २००५ (२००५ चा ३९) प्रारंभ झाल्यानंतर, केवळ आजोबा, हिंदू कायद्या अंतर्गत धार्मिक दायित्वाच्या आधारावर, अशा मुलाचे, नातूचे किंवा पणतूचे असे कोणतेही कर्ज फेडण्यासाठी कोणतेही न्यायालय मुलगा, नातू किंवा पणतू यांच्याविरुद्ध त्याचे वडील, आजोबा किंवा थोर यांच्याकडून देय असलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी कारवाई करण्याचा कोणताही अधिकार मान्य करणार नाही :
परंतु हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ (२००५ चा ३९) प्रारंभापूर्वी करार झालेल्या कोणत्याही कर्जाच्या बाबतीत निम्नलिखित गोष्टींना प्रभावित करणार नाही, –
(a)क) परिस्थितीनुसार, मुलगा, नातू किंवा पणतू याच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचा कोणत्याही कर्जदाराचा अधिकार; किंवा
(b)ख) अशा कोणत्याही कर्जाच्या संबंधात किंवा समाधानासाठी केलेले कोणतेही पृथक्करण (संक्रामण) आणि असे कोणतेही अधिकार किंवा धार्मिक कर्तव्याच्या नियमांतर्गत त्यात पद्धतीने आणि त्याच मर्यादेपर्यक लागू केले जाईल जेसे की त्यावेळी लागू केले गेले असते परंतु हिंदू उत्तराधिकारी (सुधारणा) कायदा २००५ (२००५ चा ३९) लागू करण्यात आला नव्हता.
(स्पष्टीकरण :
खंड (क) च्या प्रयोजनासाठी, मुलगा, नातू किंवा पणतू ही अभिव्यक्ती, मुलगा, नातू किंवा पणतू यांचा सदर्भ घेते असे मानले जाईल, जसे की ज्यांचा हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम २००५ च्या प्रारंभापूर्वी जन्म झाला होता किंवा त्यांना दत्तक ग्रहण केले होते.
५) या कलमातील कोणतीही गोष्ट २० डिसेंबर २००४ पूर्वी झालेल्या विभाजनाला लागू होणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी विभाजन म्हणजे नोंदणी अधिनियम १९०८ (१९०८ चा १६) अंतर्गत रीतसर नोंदणी केलेल्या विभाजन विलेखाच्या अंमलबजावणीद्वारे केलेले कोणतेही विभाजन किंवा न्यायालयाच्या आदेशाद्वारे झालेले विभाजन.)
———
१. २००५ चा अधिनियम ३९ – कलम ३ द्वारा (९-९-२००५ पासून) कलम ६ ऐवजी घातले.
यापूर्वी खालील प्रमाणे होते :
जेव्हा एखादा हिंदू पुरुष या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यू पावला असून त्याच्या मृत्यूसमयी मिताक्षरा सहदायकी संपत्तीत त्याचा हितसंबंध असेल तेव्हा त्याचा त्या संपत्तीतील हितसंबंध उत्तरजीवित्वाच्या तत्वानुसार सहदायकीतील उत्तरजीवी सदस्यांकडे प्रक्रांत होईल, या अधिनियमानुसार नव्हे :
परंतु, जर मृताच्या मागे, अनुसूचीच्या १ ल्या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या स्त्री नातलग किंवा जो अशा स्त्रो-नातलगांमार्फत दावा सांगतो असा त्या वर्गातील विनिदिष्ट पुरुष-नातलग हयात असेल तर, मृताचा मिताक्षरा सहदायकी संपत्तीतील हितसंबंध या अधिनियमाखाली, मृत्युपत्रीय किंवा प्रकरणपरत्वे, अमृत्युपत्रीय उत्तराधिकारानुसार प्रक्रांत होईल, उत्तरजीवित्वाच्या तत्वानुसार नव्हे.
स्पष्टीकरण १ :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, हिंदू मिताक्षरा सहदायादाचा हितसंबंध हा त्याच्या मृत्यूच्या निकटपूर्वी जर संपत्तीची वाटणी झाली असती तर त्याला वाटून देण्यात आला असता तेवढा त्या संपत्तीतील हिस्सा असल्याचे मानले जाईल-मग वाटणी होण्याची मागणी करण्यास तो हक्कदार असो वा नसो.
स्पष्टीकरण २ :
या कलमाच्या परंतुकात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे, मृताच्यां मृत्यूपूर्वी सहदायकीपासून जी स्वतः विभक्त झाली असेल ती किंवा तिच्या वारसांपैकी कोणीही त्यात निर्दिष्ट केलेल्या हितसंबंधातील हिश्श्यावर दावा सांगण्यास विनामृत्युपत्रिकेमुळे समर्थ होते असा त्या गोष्टीचा अर्थ लावला जाणार नाही.