हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
राजगामिता (सरकारजमा करणे) :
कलम २९ :
वारसदारांचा अभाव :
जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मागे या अधिनियमाच्या उपबंधानुसार त्याच्या किवा तिच्या संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अर्ह असलेला कोणताही वारसदार हयात नसेल तर, अशी संपत्ती शासनाकडे प्रक्रांत होईल, आणि शासनाला तो संपत्ती, वारसदार ज्यांना अधीन झाला असता त्या सर्व आबंधनांसह व दायित्वांसह प्राप्त होईल .