हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम २२ :
विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार :
१) जेथे, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या कोणत्याही स्थावर संपत्तीतील अथवा त्याने किंवा तिने – मग एकट्याने असो वा इतरांच्या समवेत असो – चालवलेल्या कोणत्याही धंद्यातील हितसंबंध अनुसूचीच्या १ ल्या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दोन किंवा अधिक वारसदारांकडे प्रकांत होईल, आणि अशा वारसदारांपैकी कोणाही एकाने संपत्तीतील किंवा धद्यातील त्याचा किंवा तिचा हितसंबंध हस्तांतरित करावयाचे योजल्यास, हस्तांतरणासाठी योजलेला हितसंबंध संपादन करण्याचा अन्य वारसदारांना अधिमानी अधिकार असेल.
२) मृताच्या संपत्तीतील कोणताही हितसंबंध कोणत्या प्रतिफलाबद्दल या कलमाखाली हस्तांतरित करता येईल ते, पक्षांमधील कोणत्याही कराराच्या अभावी, न्यायालयाकडे त्याबाबत अर्ज करण्यात आल्यावर त्याच्याकडून निर्धारित केलेल्या प्रतिफलाबद्दल् ती संपादन करण्यास राजी नसेल तर, अशी व्यक्ती अर्जाचा किंवां त्यास आनुषंगिक असलेला सर्व खर्च देण्यास दायी असेल.
३) जर या कलमाखाली कोणताही हितसंबंध संपादन करु इच्छिणारे, अनुसूचीच्या १ ल्या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केलेले दोन किंवा अधिक वारसदार असतील तर,ज़ो वारसदार हस्तांतरणासाठी सर्वाधिक प्रतिफल देऊ करील त्याला अधिमान दिला जाईल.
स्पष्टीकरण :
या कलमात, न्यायालय याचा अर्थ, ज्याच्या अधिकारितेच्या सीमांच्या आत ती स्थावर संपत्ती असेल किंवा तो धंदा चालवला जात असेल ते न्यायालय असा आहे व राज्य शासन याबाबत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अन्य कोणत्याही न्यायालयाचा त्यात समावेश आहे.