हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १३ :
श्रेणींची संगणना :
१) गोत्रज किंवा भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम निर्धारित करण्याच्या प्रयोजनार्थ, नातेसंबंधाची गणना अकृतमृत्युपत्र व्यक्तीपासून वारसदारापर्यंत, आरोही वंशक्रम श्रेणींच्या किंवा प्रकरणपरत्वे, अवरोेही वंशक्रम श्रेणींच्या किंवा दोन्हीच्या अनुसार केली जाईल.
२) आरोही वंशक्रमाच्या श्रेणी आणि अवरोही वंशक्रमाच्या श्रेणी यांची संगणना अकृतमृत्युपत्र व्यक्ती धरुन केली जाईल.
३) प्रत्येक पिढी ही आरोही वंशक्रमाची किंवा अवरोही वंशक्रमाची श्रेणी असते.