हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १२ :
गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम :
प्रकरणपरत्वे, गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम याखाली घालून दिलेल्या अधिमान-नियमांनुसार निर्धारित होईल :
नियम १ :
दोन वारसदारांपैकी, ज्याला आरोही वंशक्रमाच्या श्रेणी कमी असतील किंवा त्या अजिबात नसतील त्याला अधिमान दिला जाईल.
नियम २ :
आरोही वंशक्रमाच्या श्रेणींची संख्या तेवढीच किंवा अजिबात नसेल त्या बाबतीत, ज्याला अवरोही वंशक्रमाच्या श्रेणी कमी असतील किंवा अजिबात नसतील त्या वारसदाराला अधिमान दिला जाईल.
नियम ३ :
जेथे नियम १ किंवा नियम २ खाली कोणताही एक वारसदार दुसऱ्यापेक्षा अधिमान मिळण्यास हक्कदार नसेल तेथे त्यांना एकसमयावच्छेदेकरुन हिस्से मिळतील.