Hsa act 1956 अनुसूची : (कलम ८ पहा)

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
अनुसूची :
(कलम ८ पहा)
वर्ग १ ला व वर्ग २ रा यांमधील वारसदार :
वर्ग १ ला :
पुत्र, कन्या, विधवा, माता, पूर्वमृत पुत्राचा पुत्र, पूर्वमृत पुत्राची कन्या, पूर्वमृत कन्येचा पुत्र, पूर्वमृत कन्येची कन्या, पूर्वमृत पुत्राची विधवा, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राचा पुत्र, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राची कन्या, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राची विधवा,१.(पुर्व मृत पुत्रीच्या पूर्व मृत पुत्रीचा पुत्र, पूर्व मृत पुत्रीच्या पूर्व मृत पुत्रीची पुत्री, पूर्व मृत पुत्रीच्या पूर्व मृत पुत्राची पुत्री, पूर्व मृत पुत्राची पूर्व मृत पुत्रीची पुत्री.)
वर्ग २ रा :
एक . पिता.
दोन . १) पुत्राच्या कन्येचा पुत्र, २) पुत्राच्या कन्येची कन्या, ३) भाऊ, ४) बहीण.
तीन . १) कन्येच्या पुत्राचा पुत्र, २) कन्येच्या पुत्राची कन्या, ३) कन्येच्या कन्येचा पुत्र, ४) कन्येच्या कन्येची कन्या.
चार . १) भावाचा पुत्र, २) बहिणीचा पुत्र, ३) भावाची कन्या, ,४) बहिणीची कन्या.
पाच . पित्याचा पिता, पित्याची माता.
सहा . पित्याची विधवा, भावाची विधवा.
सात . पित्याचा भाऊ, पित्याची बहीण.
आठ . मातेचा पिता, मातेची माता.
नऊ . मातेचा भाऊ, मातेची बहीण.
स्पष्टीकरण :
या अनुसूचीत भाऊ किंवा बहीण यांच्या निर्देशात होदर भाऊ किंवा बहीण यांच्या निर्देशांचा समावेश नाही.
——-
१. २००५ चा अधिनियम ३९ कलम ७ द्वारे (९-९-२००५ पासून) समाविष्ट केले.

Leave a Reply