हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २८ :
१.(हुकूमनामे व आदेश यांवर अपिले :
१) या अधिनियमाच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये न्यायालयाने केलेले सर्व हुकूमनामे हे जणू काही न्यायालयाने आपल्या अव्वल दिवाणी अधिकारितेचा वापर करुन काढलेले हुकूमनामे असावेत त्याप्रमाणे, पोटकलम (३) च्या उपबंधाच्या अधीनतेने, अपीलपात्र असतील आणि न्यायालयाने आपल्या अव्वल दिवाणी अधिकारितेचा वापर करुन दिलेल्या न्यायनिर्णयांच्या विरुद्ध सर्वसाधारणपणे ज्या न्यायालयाकडे अपिले करता येतात अशा न्यायालयांकडे प्रत्येक उपरोक्त अपील होऊ शकेल.
२) या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये न्यायालयाने कलम २५ किंवा कलम २६ अन्वये दिलेले आदेश हे अंतरिम आदेश नसतील तर, पोटकलम (३) च्या उपबंधांच्या अधीनतेने, ते अपीलपात्र असतील, आणि न्यायालयाने आपल्या अव्वल दिवाणी अधिकारितेचा वापर करुन दिलेल्या न्यायनिर्णयांच्या विरुद्ध सर्वसाधारणपणे ज्या न्यायालयाकडे अपिले करता येतात त्या न्यायालयाकडे प्रत्येक उपरोक्त अपील होऊ शकेल.
३) केवळ जादा खर्चाच्या विषयावर या कलमान्वये अपील करता येणार नाही.
४) या कलमाखालील प्रत्येक अपील, हुकूमनाम्याच्या किंवा आदेशाच्या दिनांकापासून २.(नव्वद दिवसांच्या कालावधीच्या) आत दाखल करावे लागेल.)
——–
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १९ द्वारे मूळ कलमाएवजी घातले.
२. २००३ चा अधिनियम ५० कलम ५ द्वारे प्रतिस्थापित.