Hma 1955 कलम २६ : अपत्यांचा ताबा :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २६ :
अपत्यांचा ताबा :
या अधिनियमाखाली कोणत्याही कार्यवाहीत न्यायालय वेळोवेळी अज्ञान अपत्यांचा ताबा, निर्वाह व शिक्षण यासंबंधी शक्य असेल त्या त्या बाबतीत त्याच्या इच्छेनुरुप व स्वत:ला न्याय्य व उचित वाटतील असे अंतरिम आदेश देऊ शकेल व असे उपबंध हुकूमनाम्यात करु शकेल आणि हुकूमनामा झाल्यानंतर, विनंतीअर्जाद्वारे त्या प्रयोेजनार्थ अर्ज आल्यावर वेळोवेळी ते अशा अपत्यांचा ताबा, निर्वाह व शिक्षण यासंबंधी अशा हुकूमनाम्याद्वारे किंवा असा हुकूमनामा मिळवण्यासाठी केलेली कार्यवाही त्यावेळेही प्रलंबित असती तर अंतरिम आदेशाद्वारे करता आले असते असे सर्व आदेश व उपबंध करु शकेल, आणि न्यायालय पूर्वी केलेले असे कोणतेही आदेश व उपबंध वेळोवेळी मागे घेऊ शकेल, निलंबित करु शकेल किंवा त्यात फरकही करु शकेल :
१.(परंतु अशा हुकुमनामा अभिप्राप्त करण्यासाठी कार्यवाही प्रलंबित असे पर्यंत अज्ञान अपत्यांच्या निर्वाह व शिक्षण यासंबंधी आवेदन प्रत्यर्थी नोटीसीच्या तारीखे पासून साठ दिवसांच्या आत पूर्ण केले जाईल.)
१.(परंतु ऐसी डिक्री अभिप्राप्त करने के लिए कार्यवाही लंबित रहने तक अप्राप्तवय अपत्यों के भरण-पोषण और शिक्षा की बाबत आवेदन को यथासंभव, प्रत्यर्थी पर सूचना की तामील की तारीख से, साठ दिन के भीतर निपटाया जाएगा ।)
——–
१. २००१ चा अधिनियम ४९ कलम ८ द्वारे समाविष्ट केले.

Leave a Reply