हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २३ :
कार्येवाहीतील हुकूमनामा :
या अधिनियमातील कोणत्याही कार्यवाहीत – मग तीत बचाव दिलेला असो वा नसो –
(a)क) अनुतोष देण्यासाठी लागणाऱ्या कारणांपैकी कोणतेही कारण अस्तित्वात आहे आणि १.(ज्या बाबतीत, कलम ५-कंड (दोन) चा उप-खंड (क), उप-खंड (ख) किंवा उप-खंड (ग) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणाच्या आधारे विनंतीअर्जदाराने अनुतोषाची मागणी केलेली असेल ती प्रकरणे खेरीजकरुन एरव्ही,) अशा अनुतोषासाठी विनंतीअर्जदार त्याच्या किंवा तिच्या स्वत:च्या दुष्कृतीचा किंवा नि:समर्थतेचा कोणत्याही तऱ्हेने फायदा घेत नाही, आणि
(b)ख) जेथे विनंतीअर्जाचे कारण हे २.(***) कलम १३ मधील पोटकलम (१) च्या खंड (झ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले कारण असेल तेथे, ज्या कृतीबद्दल किंवा कृतींबद्दल तक्रार केलेली आहे त्यात विनंतीअर्जदार कोणत्याही प्रकारे सहायक झालेला नाही किंवा त्याने त्याकडे काणाडोळा केलेला नाही किंवा त्या क्षमापित केलेल्या नाहीत, अथवा जेथे विनंतीअर्जाचे कारण क्रूरपणाची वागणूक हे असेल तेथे विनंतीअर्जदाराने ती वागणूक कोणत्याही प्रकारे क्षमापित केलेली नाही, आणि
(bb)३.(खख) जेव्हा परस्परसंमती असल्याच्या कारणावरुन घटस्फोटाची मागणी केलेली असेल तेव्हा, अशी संमती बळजबरीने, कपटाने किंवां गैरवाजवी दडपण आणून मिळवलेली नाही, आणि)
(c)ग) ४.((कलम ११ खाली सादर केलेला विनंती अर्जसोडून अन्य) विनंती अर्ज) उत्तरवादीशी संगनमत करुन सादर करण्यात किंवा चालवण्यात आलेला नाही, आणि
(d)घ) कार्यवाही मांडण्यात कोणताही अनावश्यक किंवा अनुचित विलंब झालेला नाही, आणि
(e)ड) अनुतोष न देण्यासारखे अन्य कोणतेही वैध कारण नाही,
याबाबत न्यायालयाची खात्री झाली तर, आणि अशाच बाबतीत, – एरव्ही नाही – न्यायालय तदनुसार अशा अनुतोषाचा हुकूमनामा करील.
२) या अधिनियमाखाली कोणताही अनुतोष देण्याची कार्यवाही करण्यापूर्वी, त्या त्या प्रकरणाच्या स्वरुपानुरुप व परिस्थितीनुरुप शक्य असेल अशा प्रत्येक प्रकरणी प्रथमत: पक्षांमध्ये सलोखा घडवून आणण्यासाठी हरएक प्रयत्न करणे हे न्यायालयाचे कर्तव्य असेल;
३.(परंतु, ज्या कार्यवाहीत कलम १३ – पोटलकम (१) च्या खंड (दोन), खंड (तीन), खंड (चार), खंड (पाच), खंड (सहा), किंवा खंड (सात) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कारणावरुन अनुदोषाची मागणी केलेली असेल अशा कोणत्याही कार्यवाहीस या पोटकलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.)
३.(३) अशाप्रकारचा सलोखा घडवून आणण्यासाठी न्यायालयास मदत व्हावी यासाठी न्यायालय पक्षांची तशी इच्छा असल्यास किंवा न्यायालयाला तसे न्याय्य व उचित वाटल्यास, कार्यवांही जास्तीत जास्त पंधरा दिवस एवढ्या वाजवी कालावधीपर्यंत तहकूब करु शकेल आणि पक्षांनी या संदर्भात नामनिर्देश केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे अथवा पक्षांना अशा कोणत्याही व्यक्तीचा नामनिर्देश करता आला नाही तर न्यायालय नेमून देईल अशा व्यक्तीकडे ते प्रकरण विचारार्थ पाठवू शकेल आणि सलोखा घडवून आणणे शक्य आहे की नाही किंवा घडवून आणला आहे किंवा कसे यासंबंधीची माहिती न्यायालयाला कळवण्यासंबंधी त्या व्यक्तीला निदेश देईल आणि ती कार्यवाही निकालात काढताना न्यायालय ती माहिती यथोचित रीत्या विचारात घेईल.
४) जेथे घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्यात आला असेल अशा प्रत्येक प्रकरणी, हुकूमनामा काढणारे न्यांयालय प्रत्येक पक्षाला त्या हुकूमनाम्याची एकेक प्रत विनामूल्य देईल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १६ द्वारे घातले.
२. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १६ द्वारे विवक्षित शब्द गाळले.
३. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १६ द्वारे घातले.
४. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १६ द्वारे विनंतीअर्ज याऐवजी घातले.