Hma 1955 कलम २० : विनंतीअर्जाचा मजकूर व त्यांचे सत्यापन :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २० :
विनंतीअर्जाचा मजकूर व त्यांचे सत्यापन :
१) या अधिनियमाखाली सादर करावयाच्या प्रत्येक विनंतीअर्जात अनुतोषाची मागणी ज्याच्यावर आधारली असेल ती तथ्ये प्रकरणाच्या स्वरुपानुसार शक्य असेल तितक्या स्पष्टपणे निवेदन करावी लागतील ४.(आणि, कलम ११ खालील विनंतीअर्ज खेरीजकरुन एरव्ही, विनंतीअर्जदार व विवाहातील दुसरा पक्ष यांच्यात संगनमत नाही असेही निवेदन करावे लागेल.)
२) या अधिनियमाखाली प्रत्येक विनंतीअर्जात अंतर्भूत असलेली निवेदने विनंतीअर्जदाराकडून किंवा अन्य सक्षम व्यक्तीकडून दावाअर्जाच्या सत्यापनासाठी कायद्याने आवश्यक केलेल्या रीतीने सत्यापित केली जातील, आणि सुनावणीच्या वेळी पुरावा म्हणून त्यांचा आधार घेता येईल.
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १३ द्वारे आणि विनंतीअर्जदार व विवाहातील दुसरा पक्ष यांच्यात संगनमत नाही असेही निवेदन करावे लागेल याऐवजी घातले.

Leave a Reply