Hma 1955 कलम १९ : १.(ज्याच्याकडे विनंतीअर्ज करावा ते न्यायालय :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
अधिकारिता व प्रक्रिया :
कलम १९ :
१.(ज्याच्याकडे विनंतीअर्ज करावा ते न्यायालय :
या अधिनियमाखालील प्रत्येक विनंतीअर्ज हा, ज्या जिल्हा न्यायालयाच्या साधारण अव्वल दिवाणी अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांमध्ये, –
एक) तो विवाह विधिपूर्वक लावण्यात आलेला असेल, किंवा
दोन) विनंतीअर्ज सादर करण्याच्या वेळी प्रतिवादी राहात असेल, किंवा
तीन) विवाहसंबंधातील पक्ष शेवटचे एकत्र राहिले असतील, किंवा
२.(तीन-क) जेव्हा पत्नी अर्जदार असेल तर अर्ज करण्याच्या वेळी ती जेथे रहात असेल,किंवा)
चार) ज्या प्रकरणात, विनंतीअर्ज सादर करण्याच्या वेळी उत्तरवादी हा अधिनियम लागू होणाऱ्या राज्यक्षेत्रांच्या बाहेर राहात असेल, किंवा तो हयात असता तर ते स्वाभाविकपणे ज्यांच्या ऐकिवात आले असते त्या व्यक्तींनी तो हयात असल्याचे सात वर्षे वा अधिक काळपर्यंत ऐकलेले नसेल त्या प्रकरणी, विनंतीअर्ज सादर करण्याच्या वेळी विनंतीअर्जदार राहात असेल, त्या न्यायालयाकडे सादर करवा लागेल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १२ द्वारे मूळ कलम १९ ऐवजी घातले.
२. २००३ चा अधिनियम ५० कलम ४ द्वारे समाविष्ट केले.

Leave a Reply